तक्रार निवारण प्रणाली
- मोबाईल फोन किंवा संगणकाच्या माध्यमातून नागरिकांना ऑनलाईन तक्रार दाखल करता यावी, या उद्देशाने या पोर्टलची निर्मिती करण्यात आलेली आहे.
- तक्रार नोंदविणे, तक्रारीची सद्यस्थिती जाणून घेणे इ. बाबी आता नागरिक शासकीय कार्यालयात प्रत्यक्ष न जाता ऑनलाईन पद्धतीने घरबसल्या करू शकतात. यामुळे मोठ्या प्रमाणावर वेळेची व श्रमाची बचत होते.
- तक्रारींना २१ दिवसात प्रशासनाकडून प्रतिसाद दिला जातो. तक्रार निवारणासंदर्भातील माहितीसुद्धा ऑनलाईन पद्धतीनेच कळविण्यात येते. तक्रार निवारणाबाबत तक्रारदारास “समाधानी” किंवा “असमाधानी” असल्याचा अभिप्रायही देता येतो.
- आपली तक्रार २१ दिवसांमध्ये निकाली न निघाल्यास शासन निर्णय क्र. संकीर्ण -२०१६ दि २४ ऑगस्ट २०१६ मधील भाग- ब, अनु. क्र. ६ नुसार आपण संबधित नोडल अधिकाऱ्यांना विचारणा करू शकता
- तक्रार दाखल करताना काही तांत्रिक अडचणी उदभवल्यास कॉलसेंटर / हेल्पलाईनवर संपर्क साधा. 022-40293000 / 022-61208900
- आपणास जर तक्रार निवारण प्रणालीबद्दल काही माहिती हवी असेल किंवा आपल्याला काही तांत्रिक अडचण जाणवत असेल तर आम्हाला खालील क्रमांकावर संपर्क साधा. आमचे कॉल सेंटर प्रतिनिधी आपणास मदत करतील.
- दूरध्वनी क्रमांक: ०२२-४०२९३००० / ८८००१७१७४२
भेट द्या: https://grievances.maharashtra.gov.in
महाराष्ट्र शासन
स्थान : जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी | शहर : परभणी | पिन कोड : 431401
दूरध्वनी : 9540613360 | भ्रमणध्वनी : 8800171742