बंद

विस्तारीत समाधान योजनेचा सांगता समारोह

19/04/2018 - 12/04/2018
जिल्हाधिकारी कार्यालय,परभणी

GOM

प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी जिल्हाधिकारी कार्यालय परभणी येथे दिनांक 21 एप्रील रोजी “नागरी सेवा दिन” म्हणुन साजरा करण्यात आला. यावर्षी केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात नवी दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण एनआयसी वेबकास्टच्या माध्यमातून करण्यात आले.
नागरी सेवा दिनाच्या नवी दिल्ली येथे झालेल्या दोन दिवसीय शासकीय कार्यक्रमाचे संपूर्ण प्रक्षेपण एनआयसी द्वारे करण्यात आले. या कार्यक्रमात मा. पंतप्रधान यांच्या हस्ते 2018 वर्षाच्या पंतप्रधान पुरस्कारांचे वाटप करण्यात आले व त्यांच्या ह्स्ते पंतप्रधान पुरस्कार-2018च्या संदर्भात दोन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.
परभणी जिल्हाधिकारी कार्यालयातील या कार्यक्रमास मा. जिल्हाधिकारी श्री पी शिव शंकर तसेच अप्पर जिल्हाधिकारी श्री आणासाहेब शिंदे यांचे सह निवासी उपजिल्हाधिकारी श्री अंकुश पिनाटे उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व कर्मचारी वर्ग तसेच जिल्हा स्तरावरील इतर कार्यालयांचे अधिकारी व कर्मचारी देखील सहभागी झाले. लाईव्ह वेब्कास्ट बाबत सर्व तांत्रिक व्यवस्था एनआयसीचे डीआयओ श्री सुनिल पोटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली एनआयसीच्या संघाने केली.