महा-रेशीम अभियान रथाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन
सन 2025-26 मध्ये तुती लागवड समुहात मनरेगा, सिल्क समग्र-2 योजने अंतर्गत तसेच वैयक्तीक नविन तुती लागवड करण्यासाठी उत्सुक असलेल्या शेतकऱ्यांची नोंदणी करण्यासाठी दि. 9 जानेवारी ते 9 फेब्रुवारी, 2025 या कालावधीत महा-रेशीम अभियान 2025 राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात महारेशीम अभियानाच्या रथास जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांचे हस्ते आज (दि. 15) रोजी हिरवी झेंडी दाखवुन शुभारंभ करण्यात आला.
यावेळी उपजिल्हाधिकारी (रोहयो) संगिता चव्हाण, रेशीम विकास अधिकारी जी.आर.कदम, क्षेत्र सहायक के.एम. जाधव, एस.ए. मिसाळ, श्री. वागदकर, श्री. हट्टेकर, ए.एस. जोगदंड, आर.एल. मुंडे, एस.आर.वाघ आणि जिल्हाधिकारी कार्यालय येथील समीर काळे आणि राजेश दुधवडे आदी मनरेगा कर्मचारी उपस्थित होते.
नविन तुती लागवड करण्यासाठी उत्सुक असलेल्या शेतकऱ्यांनी नाव नोंदणी करण्यासाठी जिल्हा रेशीम कार्यालय, निवास क्रमांक A/33, कृषी महाविद्यालय परीसर क्र. 1, ग्रंथालयाजवळ वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे संपर्क करावा. तसेच तालुका कृषी कार्यालय व पंचायत समिती, कृषी विभाग यांच्याशी संपर्क साधुन नविन तुती लागवड करीता सभासद नोंदणी करावी असे आवाहन रेशीम विकास अधिकारी, परभणी यांनी केले आहे.