Spontaneously participate in the “Har Ghar Tiranga” campaign – Hon. District Collector Raghunath Gawade
“हर घर तिरंगा” अभियानात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे- जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे
राज्यात दि. 15 ऑगस्ट 2025 पर्यंत “हर घर तिरंगा” अभियान राबविण्यात येणार आहे. या उपक्रमातंर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, या उपक्रमात विद्यार्थी, युवक नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात “हर घर तिरंगा” अभियानाबाबत आढावा घेण्यात आला. बैठकीस अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले आदींसह विभागप्रमुख उपस्थित होते.
“हर घर तिरंगा” अभियानाच्या यशस्वीतेसाठी पहिल्या टप्प्यात स्वयंसेवकाच्या माध्यमातून “हर घर तिरंगा” अभियान घरोघरी पोहोचविण्यासाठी युवकांनी harghartiranga.com या संकेतस्थळावर 8 ऑगस्टपर्यंत नोंदणी करावी. शिक्षण विभागाने शाळास्तरावर अभियानाची जनजागृती करावी. शाळा, महाविद्यालयांनी विविध स्पर्धांचे आयोजन करावे. याशिवाय संबंधित विभागांनी हर घर तिरंगा, हर घर स्वच्छता उपक्रम, सार्वजनिक ठिकाणी विदुत रोषाणाई करावी. दुसऱ्या टप्प्यात दि. 8 ते 12 ऑगस्ट या कालावधीत तिरंगा महोत्सव, देशभक्तीपर गाण्यांचे कार्यक्रम, तिरंगा बाईक व सायकल रॅली आदी कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. तर तिसऱ्या टप्प्यात दि. 13 ते 15 ऑगस्ट 2025 या कालावधीत प्रत्येक घरावर राष्ट्रध्वज फडकविणे अभिप्रेत आहे. शासनाच्या सर्व विभागांनी/ कार्यालयांनी या अभियानात सहभाग घ्यावा. घरांव्यतिरिक्त शासकीय/निमशासकीय सहकारी/ खाजगी आस्थापना कार्यालय या ठिकाणी राष्ट्रध्वज फडकविण्यात यावा.
“हर घर तिरंगा” अभियानातंर्गत जिल्ह्यातील प्रमुख शासकीय कार्यालये / महत्त्वाची स्थळे/ पाणीसाठे आणि वारसा स्थळे या ठिकाणी तिरंगा रोषणाई करणे अपेक्षित आहे. विविध प्रकारच्या स्पर्धा जसे की रांगोळी स्पर्धा, राखी निर्माण स्पर्धा आयोजित करण्यात याव्यात. या स्पर्धा तिरंगा विषयक आशयाशी संबंधित असाव्यात, ज्या ठिकाणी स्पर्धा शक्य नाही त्या ठिकाणी कार्यशाळेचे आयोजन करण्यात यावे. सर्व शासकीय संकेतस्थळांवर “हर घर तिरंगा” विषयक मजकूर आणि संबंधित लोगो असावेत. यावर्षी “हर घर तिरंगा, हर घर स्वच्छता स्वतंत्रता का उत्सव, स्वच्छता के संग” या घोषवाक्यासह “हर घर तिरंगा” अभियान साजरे करावयाचे आहे, स्वच्छता मोहिमा हाती घेणे आवश्यक आहे. या उपक्रमाचे महत्त्व लक्षात घेता शाळा आणि विद्यालयांमध्ये या उपक्रमाची माहिती देण्यात यावी. 15 ऑगस्ट रोजी अमृत सरोवर आणि सार्वजनिक स्थळे अशा ठिकाणीही राष्ट्रध्वज फडकण्यात यावा. या अभियानामधील आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे अभियानाची माहिती सर्व नागरिकापर्यंत पोहोचविण्यासाठी स्वयंसेवकानी पुढे यावे, यासाठी स्वयंसेवकांनी हर घर तिरंगा या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करणे आवश्यक आहे याकरीता. एन.एस.एस. महाविद्यालयीन विद्यार्थी व इतरांना स्वयंसेवक म्हणून नोंदणी करता येईल. “हर घर तिरंगा” अभियानाच्या अनुषंगाने “तिरंगा मेला” याचे आयोजन करावे. त्यानुसार कार्यवाही करण्यात यावी. ज्याप्रमाणे “सरस” प्रदर्शनाचे आयोजन होत असते. त्याच धर्तीवर आयोजन व्हावे. तिरंगासह सेल्फी सारख्या उपक्रमांवर विशेष लक्ष देऊन नागरीकांनी आपल्या सेल्फी संकेतस्थळावर अपलोड करणेही महत्वाचे आहे. अधिक माहिती, स्वयंसेवक नोंदणी, सेल्फी अपलोड करण्यासाठी https://harghartiranga.com या संकेतस्थळाला भेट द्यावी, अशा सूचना पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने केल्या आहेत.