


मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रम

सकाळी 10 ते 1 – चित्रकला स्पर्धा
स्थळ- कल्याण मंडपम जायकवाडी वसाहत परभणी
समन्वय अधिकारी – श्री. गोविंद मोरे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जि. परभणी
सायंकाळी 5 ते 7 – कविसंमेलन व इतर कार्यक्रम
स्थळ- बी.रघुनाथ सभागृह शिवाजी पुतळ्याजवळ परभणी
समन्वय अधिकारी – श्री. जयवंत सोनवणे, उपायुक्त महानगरपालिका परभणी

सकाळी 6:30 ते 7:30 एकता दौड/सायकल रॅली
स्थळ – इंदिरा गांधी स्टेडियम ते हुतात्मा स्मारक राजगोपालचारी उद्यान शिवाजी नगर परभणी
समन्वय अधिकारी – श्री. जयकुमार टेंभरे, जिल्हा क्रिडा अधिकारी
सकाळी 10 ते 12 – मराठवाडा मुक्तिसंग्राम अनुषगाने व्हिडिओ प्रेसेंटेशन
स्थळ – सर्व शाळा जि.प. प्राथमिक व माध्यमिक जि. परभणी
समन्वय अधिकारी – श्री. गोविंद मोरे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जि. परभणी
सायंकाळी 4 ते 6 – मराठवाडा मुक्तिसंग्राम अनुषंगाने डॉ. महेश जोशी, प्राध्यापक(शिक्षण संकुल)स्वा.रा.ती.म विद्यापीठ नांदेड यांचे व्याख्यान
स्थळ – बी.रघुनाथ सभागृह शिवाजी पुतळ्याजवळ परभणी
समन्वय अधिकारी – श्री. पाचंगे, अप्पर कोषागार अधिकारी

सकाळी – 6:30 ते 9:00 – प्रभातफेरी शहरातील सर्व मोठ्या शाळा
स्थळ – इंदिरा गांधी स्टेडियम ते हुतात्मा स्मारक राजगोपालचारी उद्यान शिवाजी नगर परभणी
समन्वय अधिकारी – श्री. गोविंद मोरे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जि. परभणी

मुख्य शासकीय ध्वज वंदना नंतर 1. स्वातंत्र्यसैनिक सत्कार 2. इतर बक्षीस वाटप कार्यक्रम
स्थळ – राजगोपालचारी उद्यान, परभणी
समन्वय अधिकारी – श्री. जयवंत सोनवणे, उपायुक्त महानगरपालिका परभणी, श्री. उत्तम मेतलवाड, अधिक्षक सार्वजनिक बांधकाम विभाग, परभणी
सायंकाळी 7 ते 9 – मराठवाड्याची लोकधारा व सांस्कृतिक कार्यक्रम ( गाणे, पोवाडा व भारुड इत्यादींचे आयोजन)
समन्वय अधिकारी – श्री. कैलास तिडके, महिला व बालविकास अधिकारी
हैद्राबाद मुक्तिसंग्राम : मराठवाड्याचा रोमहर्षक स्वातंत्र्यलढा- माहितीपट
क्षणचित्रे

मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव निमित्त तहसील कार्यालय पालम येथील देखावा

गंगाखेड येथे मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव वर्ष 2023 निमित्त विविध शाळेतून व महाविद्यालयातून तहसील कार्यालयाच्या प्रांगणात प्रभातफेरी काढण्यात आली. याप्रसंगी प्रभात फेरीत सहभागी विद्यार्थी, विद्यार्थीनी, त्यांचे सोबतचे शिक्षकवृंद यांना खाऊ, बिस्किट व पाणी चे वाटप करण्यात आले. प्रभात फेरीत मोठ्या संख्येने विद्यार्थी, विद्यार्थिनी व शिक्षकवर्ग उपस्थित होते.

तहसील कार्यालय गंगाखेड- मराठवाडा मुक्ती संग्राम दिन अमृत महोत्सव वर्ष 2023 चित्रकला व रांगोळी स्पर्धा सुरू

महाराष्ट्र टाइम्स मधील बातमी

तहसील कार्यालय सेलु येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

तहसील कार्यालय सेलु येथे रक्तदान शिबिरातील क्षणचित्रे

पालम तालुक्यातील मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव निमित्त आयोजित विविध स्पर्धांची क्षणचित्रे

मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सव निमित्त गंगाखेड येथे मॅरेथॉन चे आयोजन

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या ध्वजारोहणाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमांमध्ये ध्वजारोहणानंतर, प्रमुख अतिथींच्या भाषणापूर्वी, वरील शपथ प्रमुख अतिथिमार्फत सर्वांना देण्यात यावी.

मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सायकल रॅली उत्साहात संपन्न

मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त एकता दौड उत्साहात संपन्न

मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त एकता दौड आणि सायकल रॅली उत्साहात संपन्न

मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त एकता दौड आणि सायकल रॅली उत्साहात संपन्न

मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवानिमित्त शासकीय जिल्हा ग्रंथालयात ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन

मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवानिमित्त शासकीय जिल्हा ग्रंथालयात ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन

‘बालविवाह मुक्त परभणी’ अभियानातंर्गत ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रमाचे आयोजन

‘बालविवाह मुक्त परभणी’ अभियानातंर्गत ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रमाचे आयोजन

मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त रांगोळी आणि चित्रकला स्पर्धेचे आयोजन

मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त रांगोळी आणि चित्रकला स्पर्धेचे आयोजन

मराठवाडा स्फूतिगीतांच्या काव्यवाचनाने रसिक मंत्रमुग्ध

‘मोगलाई धमाल’ एकपात्री नाटकाने सांस्कृतिक कार्यक्रमाचा प्रारंभ

ग्रामीण रुग्णालय पालम येथे भव्य रक्तदान शिबीर

मराठवाडा मुक्तिसंग्राम महोत्सव जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्याकडून शालेय प्रभातफेरीला हिरवा झेंडा
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त आज सकाळी जिल्हा प्रशासनाकडून प्रियदर्शिनी इंदिरा गांधी जिल्हा क्रीडा संकुल येथून शहरातील विविध शालेय विद्यार्थ्यांची प्रभातफेरी काढण्यात आली. या प्रभातफेरीला जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी हिरवा झेंडा दाखवत प्रारंभ झाला.
अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, प्रकल्प संचालक श्रीमती रश्मी खांडेकर, अपर मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, उप विभागीय अधिकारी दत्तु शेवाळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संदीप घोन्सीकर, तहसीलदार संदीप राजपुरे, श्रीराम बेंडे, अमित घाडगे, सुरेश घोळवे, शिक्षणाधिकारी गणेश शिंदे, शिक्षणाधिकारी (नियोजन) संजय ससाणे, क्रीडा अधिकारी शैलेश गौतम यांच्यासह अधिकारी –कर्मचारी, विविध शाळांचे शिक्षक उपस्थित होते.
यावेळी शहरातील गांधी विद्यालय, पृथ्वीराज देशमुख मुलींची सैनिकी शाळा, नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळा व कनिष्ठ महाविद्यालय, जिजाऊ आयटीआय, बाल विद्या मंदिर हायस्कूल, जिजाऊ ज्ञानतीर्थ आयटीआय, नूतन विद्या मंदिर, मराठवाडा हायस्कूल, परभणी जिल्हा गतका असोसिएशन, बाल विद्या मंदिर, नानलपेठ, रायरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, जिल्हा परिषद कन्या प्रशाळा, सावित्रीबाई फुले विद्यालय, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाचे विद्यार्थी सहभागी झाले होते. ही प्रभातफेरी शालेय शिक्षण विभाग, जिल्हा क्रीडा विभाग, आणि जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती.
या प्रभातफेरीत सहभागी विद्यार्थ्यांनी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन चिरायु होवो, भारत माता की जय, वंदे मातरमच्या जयघोषाने परिसर दणाणून सोडला. या शालेय विद्यार्थ्यांची प्रभातफेरी राजोपालचारी उद्यानात पोहचल्यानंतर जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी ज्ञानसाधना बॅण्ड पथकाचा जोश पाहून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक श्रीमती रश्मी खांडेकर यांनी पथकासोबत वाद्य वाजवून साथसंगत दिली. त्यानंतर जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनीही तेच वाद्य बराच वेळ वाजवत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. त्यानंतर पुन्हा श्रीमती खांडेकर यांनी इतर वाद्य वाजवत जिल्हाधिकारी श्री. गावडे यांना साथ दिली. दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वाद्ये वाजविल्याने विद्यार्थ्याचा आनंद व उत्साह द्विगुणित झाला. उद्या रविवार, दि. १७ सप्टेंबर २०२३ रोजी गृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते होणाऱ्या मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमाची रंगीत तालीम घेण्यात आली.
जिल्हा प्रशासनाकडून गेल्या तीन दिवसांपासून नागरिकांना विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी मिळत आहे. या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा नागरिकांनी आस्वाद घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले आहे.

मराठवाडा मुक्तिसंग्राम अनुषंगाने डॉ. महेश जोशी, प्राध्यापक(शिक्षण संकुल)स्वा.रा.ती.म विद्यापीठ नांदेड यांचे व्याख्यान







गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते परभणी जिल्हा विशेष पुरवणी आवृत्तीचे विमोचन
राज्याचे गृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवी दिनानिमित्त परभणी जिल्हा विशेष पुरवणी आवृत्तीचे विमोचन करण्यात आले.
येथील राजगोपालचारी उद्यानात आयोजित मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवी दिनाच्या मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमात खासदार संजय जाधव, आमदार राहूल पाटील, आमदार श्रीमती मेघना बोर्डीकर, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रश्मी खांडेकर, पोलीस अधीक्षक रागसुधा आर., मनपा आयुक्त तृप्ती सांडभोर, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, अतिरिक्त पोलिस अधीक्षक यशवंत काळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपविभागीय अधिकारी दत्तु शेवाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
ब्रिटीश कालावधीत प्रथम परभणी जिल्हा गॅझेटिअर (इंग्रजी) आवृत्ती सन 1967 मध्ये प्रकाशित करण्यात आली होती. याच गॅझेटिअरची पुरवणी सन 1989 मध्ये प्रकाशित करण्यात आली होती. या ग्रंथाला मिळालेला प्रतिसाद लक्षात घेवून त्याचे पुनर्मुद्रणाचे काम हाती घेण्यात आले आहे. सन 1988 मध्ये प्रकाशित झालेल्या परभणी जिल्हा मराठी गॅझेटिअरला 32 वर्ष झाल्याने याच जिल्हा गॅझेटिअरची पुरवणी काढून अमुलाग्र बदलांची संक्षिप्ताने नोंद घेवून मागील तीन दशकात लोककल्याणकारी गतिमान शासनाने जिल्ह्यात राबविलेल्या विविध योजना व केलेल्या कामांचा आढावा घेणारी पुरवणी प्रकाशित करण्यात आली आहे. यामध्ये विशेष कामांची जाणीवपूर्वक नोंद घेण्यात आली आहे. ही पुरवणी म्हणजे नवीन ग्रंथ नसुन सांख्यीकीय तक्त्यांच्या आधारे मूळ ग्रंथातील नोंदीनंतरचा टप्पा नोंदविण्यात आला आहे.
परभणी जिल्हा विशेष पुरवणी आवृत्तीसाठी दर्शनिका विभागाचे कार्यकारी संपादक व सचिव डॉ. दि. प्र. बलसेकर यांच्या मार्गदर्शनात सहसंपादक श्रीमती सा.प्र. पिंपळे, संशोधन अधिकारी दि. वि. भगत, सहायक संशोधन अधिकारी श्रीमती स.सु. गोसावी आणि लघुलेखक वि. प. गुळगुळे यांनी मर्यादित वेळेत काम करुन ही आवृत्ती प्रकाशित केली आहे.
यावेळी जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी, विविध विभागातील अधिकारी-कर्मचारी आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.


मराठवाडा मुक्ती संग्रामदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते ध्वजारोहण
मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित ध्वजारोहण समारंभात जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते आज ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी, उपविभागीय अधिकारी दत्तु शेवाळे यांच्यासह अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती होती.
