जिल्हाधिकारी कार्यालय
जिल्हाधिकारी कार्यालयाचे नेतृत्व जिल्हाधिकारी करतात. महसूल प्रशासनासोबतच जिल्हाधिकारी जिल्ह्यातील राज्य शासनाच्या इतर विभागांच्या कामकाजाचे समन्वय साधतात. जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाची अनेक शाखा किंवा विभाग असतात जे उप-जिल्हाधिकारी किंवा तहसीलदारांच्या पदाधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली असतात.
विभाग प्रमुख | विभाग |
---|---|
निवासी उपजिल्हाधिकारी |
महसुल शाखा दंडाधिकारी शाखा सामान्य शाखा आस्थापना माजी सैनिक कल्याण शाखा मनोरंंजन शाखा |
उपजिल्हाधिकारी रोहयो | रोजगार हमी योजना |
उपजिल्हाधिकारी पुनर्वसन | पुनर्वसन शाखा |
उपजिल्हाधिकारी निवडणुक | निवडणुक शाखा |
उपजिल्हाधिकारी भुसंंपादन | भुसंंपादन शाखा |
उपजिल्हाधिकारी नियोजन | नियोजन शाखा |
उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन | सामान्य प्रशासन शाखा |
जिल्हा पुरवठा अधिकारी | पुरवठा शाखा |
प्रशासकीय अधिकारी | नगरपालिका प्रशासन |
परभणी जिल्ह्यातील उप-विभागांची प्रशासकीय रचना
परभणी जिल्ह्यातील नऊ तालुके, चार उपविभागात विभागले असून, प्रत्येक उपविभागात उपविभागीय अधिकारी यांच्याद्वारे त्या उपविभागातील तालुक्यांचे नियंत्रन आणि समन्वयन केले जाते. उपविभाग निहाय तालुक्यांची नावे खालील प्रमाणे आहेत.
उपविभागाचे नाव | तालुक्यांची नावे |
---|---|
परभणी | परभणी |
सेलू | सेलू, जिंतूर |
गंगाखेड | गंगाखेड, पालम, पुर्णा |
पाथ्री | पाथ्री, मानवत, सोनपेठ |