• जागेचा नकाशा
  • Accessibility Links
बंद

जागतिक योग दिन उत्साहात साजरा : जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्यासह नागरिकांचा सहभाग

21/06/2025 - 31/07/2025

 

 

yog day 2

जागतिक योग दिनानिमित्त परभणी येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी जिल्हा क्रीडा संकुलात जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर यांच्या उपस्थितीत विविध योगासनांच्या माध्यमातून योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमात जिल्हा प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी तसेच शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी, नागरिक मोठ्या संख्येने सहभाग घेतला. या वेळी उपस्थितांनी विविध योगासने, प्राणायाम व ध्यानाच्या माध्यमातून योगाचे महत्त्व अधोरेखित केले.

योगसाधनेमुळे शारीरिक व मानसिक आरोग्य टिकवता येते तसेच जीवनात सकारात्मकता निर्माण होते, असा संदेश यावेळी देण्यात आला. या कार्यक्रमात अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून योग दिनाचा उत्साह द्विगुणित केला.

 

yog day