बंद

निबंध लेखन आणि छायाचित्रण स्पर्धा (स्पर्धेचा कालावधी २५ ऑगस्ट २०१८ पर्यंत वाढविलेला आहे)

05/08/2018 - 15/09/2018
essay writing & photo cometition

competition logo

निबंध लेखन आणि छायाचित्रण स्पर्धा (स्पर्धेचा कालावधी २५ ऑगस्ट २०१८ पर्यंत वाढविलेला आहे)

परभणी जिल्ह्याचा साहित्य आणि कला क्षेत्रातील वारसा लक्षात घेऊन मा. जिल्हाधिकारी यांच्या संकल्पनेतून आणि मा.निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली परभणी जिल्हा सेतू समितीतर्फे भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून जिल्ह्यातील नागरीकांसाठी निबंध लेखन स्पर्धा आणि छायाचित्रण (फोटोग्राफी) स्पर्धा आयोजित केली आहे.
सदर स्पर्धेसाठी दिनांक ५ ऑगस्ट २०१८ ते १५ ऑगस्ट २०१८ पर्यंत प्रवेशिका फक्त ऑनलाईन Online पद्धतीने स्विकारण्यात येणार असून त्याकरीता जिल्हा प्रशासनाने एनआयसीच्या मदतीने एक स्वतंत्र पोर्टल विकसीत केले आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी www.collectorpbn.in/compete/ यासंकेतस्थळावर स्पर्धकांनी आपली नोंदणी करणे आवश्यक आहे.

स्पर्धेचे प्रकार आणि विषय :

स्पर्धा क्रमांक १ (निबंधलेखन) : परभणी जिल्ह्याचा साहित्य आणि कलेचा वारसा
स्पर्धा क्रमांक २ (निबंधलेखन) : परभणी : संतांची भूमी
स्पर्धा क्रमांक ३ (निबंधलेखन) : परभणी जिल्ह्यातील ऐतिहासीक आणि प्रेक्षणीय स्थळे
उदा. (खालील कोणतेही एक) नेमगिरी, नवागड, हजरत तूराबुल
हक दर्गा, पोखर्णी नृसिंह, पारदेश्व्र ,मूदगलेश्वरर , पाथरी साईबाबा
जन्मरस्थादन, चारठाणा मंदिर, धारासूर, गुंज, नैकोटवाडी, वरुड नृसिंह,
जांभूळबेट, केशवराज बाबासाहेब मंदीर सेलू किंवा इतर (कोणतेही एक)
स्पर्धा क्रमांक ४ (निबंधलेखन) : परभणी जिल्ह्याचे ऐतिहासिक महत्व

स्पर्धा क्रमांक ५ (छायाचित्र/फोटोग्राफी) : परभणी जिल्ह्यातील ऐतिहासीक आणि प्रेक्षणीय स्थळे