मा. पंंतप्रधान यांंचा आयटी व्यवसायिकांंसोबत संंवाद – विषय : SELF4SOCIETY
भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी बुधवार दिनांक 24 ऑक्टोबर 2018 रोजी देशातील आयटी व्यावसायिकांसोबत संवाद साधणार आहेत. नवी दिल्ली, जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर 3.40 वाजता आयोजित होणार्याो कार्यक्रमाचा मुख्य विषय SELF4SOCIETY अर्थात आयटी कॉर्पोरेट आणि आयटी व्यावसायिकांकडून सामाजिक क्षेत्रातील स्वयंसेवी प्रयत्न आणि पुढाकार. कार्यक्रमादरम्यान माननीय पंतप्रधान देशभरातील आयटी कंपन्यांकडून सहभागी होण्यासाठी सुमारे दोन हजार व्यावसायिकांच्या समुहास मार्गदशन करणार आहेत.
ह्या कार्यक्रमाचे लाईव्ह व्हीडीओ-स्ट्रीमींग राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्रा मार्फत http://pmindiawebcast.nic.in या संकेतस्थळावर थेट प्रक्षेपीत केला जात आहे. तसेच देशातील सर्व राज्ये आणि जिल्हास्तरावरील एनआयसीच्या कार्यालयातून व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे ह्या कार्यक्रमात सहभागी होता येणार आहे. परभणी जिल्हाधिकारी कार्यालयातील एनआयसी विभागातील व्हीडीओ कॉन्फरन्स स्टुडीओमध्ये हा कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण आयोजित करण्यात आले असून जिल्ह्यातील सर्व आयटी कॉर्पोरेट आणि आयटी व्यावसायिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी श्री सुनिल पोटेकर यांनी केले आहे.