बंद

आय.टी.आय. परभणी येथे – जागतिक सायकल दिनानिमित्त सायकल रॅलीचे आयोजन

आय.टी.आय. परभणी येथे – जागतिक सायकल दिनानिमित्त सायकल रॅलीचे आयोजन
शीर्षक वर्णन सुरवातीचा दिनांंक शेवटचा दिनांंक संचिका
आय.टी.आय. परभणी येथे – जागतिक सायकल दिनानिमित्त सायकल रॅलीचे आयोजन

 

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था परभणी येथे दि. ३ जुन २०२२ रोजी राष्ट्रीय सेवा योजने तर्फे जागतिक सायकल दिनानिमित्त सायकल रॅलीचे आयोजन शा. औ. प्र. संस्थेचे प्राचार्य श्री. एस.व्ही. सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. सदर रॅली ITI ते विसावा कॉर्नर या भागात काढण्यात आली. त्यानुषंगाने सायकलच्या वापरातून आरोग्याविषयी आणि पर्यावरण विषयी जागृती, इंधन व पैसे बचतीचे महत्व फलक आणि घोषवाक्याच्या माध्यमातून जनतेला पटवून दिले.
सदर रॅलीचे नियोजन गट निदेशक श्री. एस.जी.भातलवंडे यांनी केले. रॅलीत श्री. डी. एन. मोरे, एस.एन. काचगुंडे तसेच कर्मचारी व प्रशिक्षणार्थी यांनी सहभाग घेतला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे श्री. डी.डी. घोडके, एस.जी. जाधव, एस. बी. छापरवाल व प्रशिक्षणार्थ्यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी API श्री. इंगेवाड, श्री. कोरडे, श्री. शिरजोशी, श्री. सपकाळ व श्री. देशमुख – कोतवाली पोलीस स्टेशन व वाहतूक शाखा यांच्याकडून मोलाचे सहकार्य प्राप्त झाले.

04/06/2022 14/07/2022 पहा (343 KB)