बंद

श्री नेमिनाथ भगवान दिगंबर जैन मंदीर नवागढ

श्री नेमिनाथ दिगंबर जैन मंदीर नवागढ हे भगवान नेमिनाथच्या प्राचीन आणि कलात्मक मूर्तीने प्रसिद्ध आहे.पुर्वी हे ठिकाण उखळद गावात वसलेले होते, जे पूर्णा नदीच्या काठावरुन सुमारे 2 किमी अंतरावर आहे. १९३१ साली नवागढ येथे भव्य मंदिर उभारण्यात आले आणि या मंदिरात ही मूर्ती स्थापित करण्यात आली. या मंदिरासाठी 10 एकर जमीन निजाम सरकारने ताबडतोब दिली.

नवागढचे मंदिर अतिशय कलात्मक, विशाल आणि अतिशय उच्च शिखराचे आहे. या मंदिरातील भगवान देवगिरीची मुख्य देवता पद्मासनात असुन, अत्यंत सुंदर 3.5 फूट उंच काळ्या रंगाची आणि चमत्कारी मुर्ती आहे.मंदिराचा आतील भागा आरश्याने झाकलेला आहे आणि ते अतिशय सुंदर आहे.

छायाचित्र दालन

  • नवागढ येथील मंदीर
  • मूळ नायक प्रभू 1008 श्री नीमिनाथ
  • नवागढ मंदिर येथील प्रवेशद्वार

कसे पोहोचाल?:

विमानाने

नवागढ पासून सर्वात जवळचे विमानतळ नांदेड येथे आहे. नांदेड पासून ५० कि.मी. अंतरावर नवागढ संस्थान स्थित आहे.

रेल्वेने

नवागढ संस्थानला जाण्यासाठी परभणी-पूर्णा रेल्वे लाईनवर मीरखेल स्टेशनला उतरावे. हैद्राबाद ते नांदेड रेल्वेन्व आल्यानंतर नांदेड त पुर्णा या रेल्वे लाईनवर मिरखेल स्टेशन आहे. औरंगाबाद ते नांदेड जाणार्‍या सर्व पॅसेंजर रेल्वे गाड्या मिरखेल येथे थांबतात.

रस्त्याने

नवागढ परभणी पासून ४० कि.मी. अंतरावर तसेच नांदेड पासून ६० कि.मी. अंतरावर आहे.