बंद

श्री मुदगलेश्वर मंदीर मुदगल

परभणी जिल्ह्यातील एक धार्मिक स्थळ म्हणजे भगवान मुदगलेश्वराचे प्रसिद्ध मंदिर आहे. हे महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक मंदिर आहे. हे मंदिर गोदावरी नदीच्या काठावर वसलेले आहे. सुरुवातीच्या काळात हे मंदिर “देवभूमी” या नावाने ओळखले जात असे. या परिसरात तीन मुख्य मंदिर आहेत. तीन मंदिरांपैकी भगवान नरसिंहाचे मंदीर नदीच्या किनार्‍यावर आहे. गोदावरी नदीच्या मध्यभागी असलेल्या दोन मंदिरापैकी एक मंदिर म्हणजे भगवान नरसिंह (मुदगलेश्वर) आणि इतर एक म्हणजे भगवान गणेशाचे (मुदगल गणेश) आहे. लोक गोदावरी नदीत स्नान करतात. मुगळेश्वर दर्शनसाठी प्रत्येक महाशिवरात्रीला बरेच भक्त येतात. मंदिरात साजरा केला जाणारा आरती भोवतालच्या आणि सभोवतालच्या परिसरात आध्यात्मिक वातावरण निर्माण करणारी आहे.

छायाचित्र दालन

  • श्री मुद्गलेश्वर मंंदीर
  • नदी मधील मंदीरे
  • मुद्गल येथील नदीवरील मंदीरे

कसे पोहोचाल?:

विमानाने

मुदलपासून सर्वात जवळचे विमानतळ नांदेड येथे आहे. नांदेडपासून मुदगल हे ८० कि.मी.अंतरावर आहे,.

रेल्वेने

मुदगलपासून सर्वात जवळचे रेल्वेस्टेशन मानवत रोड हेआहे. मानवतरोड हे रेल्वे स्टेशन परभणी-औरंगाबाद रेल्वे मार्गावर आहे. परभणी हे हैद्राबाद आणि औरंगाबाद ह्या शहरांना दक्षिण-मध्य रेल्वेच्या अनेक रेल्वेद्वारे जोडलेले आहे.

रस्त्याने

मुदगल हे पाथ्री पासून १० कि.मी. अंतरावर आहे, पाथ्री हे निर्मल-मुंबई या राष्ट्रीय महामार्गावर परभणीपासून ४०कि.मी.अंतरावर आहे.