श्री साईबाबा मंदीर,पाथरी
१९७० च्या दशकात एक क्षेत्र संशोधन झाले की साई बाबाचा जन्म पाथरी गावात झाला. पथरी येथे श्री साई स्मारक समितीची (साई स्मारक समिती) स्थापना झाली. १९९४ साली साई बाबा यांच्या निवासस्थानासाठी मंदिरासाठी जमीन खरेदी केली आणि मंदिराचे बांधकाम सुरू करण्यात आले. १९९९ साली सार्वजनिक मंदिराचे उद्घाटन करण्यात आले.
छायाचित्र दालन
कसे पोहोचाल?:
विमानाने
पाथरी च्या सर्वात जवळील विमानतळ नांंदेड आहे. पाथरी नांंदेड पासुन १२१ कि.मि. अंतरावर आहे.
रेल्वेने
पाथरी च्या सर्वात जवळील रेल्वे स्थानक मानवत रोड आहे. मानवतरोड हे रेल्वे स्टेशन परभणी-औरंगाबाद रेल्वे मार्गावर आहे. परभणी हे हैद्राबाद आणि औरंगाबाद ह्या शहरांना दक्षिण-मध्य रेल्वेच्या अनेक रेल्वेद्वारे जोडलेले आहे.
रस्त्याने
पाथरी हे निर्मल-मुंबई या राष्ट्रीय महामार्गावर परभणीपासून ४०कि.मी.अंतरावर आहे.