बंद

तक्रार निवारण प्रणाली

  1. मोबाईल फोन किंवा संगणकाच्या माध्यमातून नागरिकांना ऑनलाईन तक्रार दाखल करता यावी, या उद्देशाने या पोर्टलची निर्मिती करण्यात आलेली आहे.
  2. तक्रार नोंदविणे, तक्रारीची सद्यस्थिती जाणून घेणे इ. बाबी आता नागरिक शासकीय कार्यालयात प्रत्यक्ष न जाता ऑनलाईन पद्धतीने घरबसल्या करू शकतात. यामुळे मोठ्या प्रमाणावर वेळेची व श्रमाची बचत होते.
  3. तक्रारींना २१ दिवसात प्रशासनाकडून प्रतिसाद दिला जातो. तक्रार निवारणासंदर्भातील माहितीसुद्धा ऑनलाईन पद्धतीनेच कळविण्यात येते. तक्रार निवारणाबाबत तक्रारदारास “समाधानी” किंवा “असमाधानी” असल्याचा अभिप्रायही देता येतो.
  4. आपली तक्रार २१ दिवसांमध्ये निकाली न निघाल्यास शासन निर्णय क्र. संकीर्ण -२०१६ दि २४ ऑगस्ट २०१६ मधील भाग- ब, अनु. क्र. ६ नुसार आपण संबधित नोडल अधिकाऱ्यांना विचारणा करू शकता
  5. तक्रार दाखल करताना काही तांत्रिक अडचणी उदभवल्यास कॉलसेंटर / हेल्पलाईनवर संपर्क साधा. 022-40293000 / 022-61208900
  6. आपणास जर तक्रार निवारण प्रणालीबद्दल काही माहिती हवी असेल किंवा आपल्याला काही तांत्रिक अडचण जाणवत असेल तर आम्हाला खालील क्रमांकावर संपर्क साधा. आमचे कॉल सेंटर प्रतिनिधी आपणास मदत करतील.
  7. दूरध्वनी क्रमांक: ०२२-४०२९३००० / ८८००१७१७४२

भेट द्या: https://grievances.maharashtra.gov.in

महाराष्ट्र शासन

स्थान : जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी | शहर : परभणी | पिन कोड : 431401
दूरध्वनी : 9540613360 | भ्रमणध्वनी : 8800171742