Close

Child Marriage Eradication Campaign

बालविवाह म्हणजे काय?

भारतात, मुलीचे वय १८ वर्षे आणि मुलाचे वय २१ वर्षे असल्यास ते कायदेशीर विवाह मानले जाते.जर मुलीचे वय १८ पेक्षा कमी असेल किंवा मुलाचे वय २१ पेक्षा कमी असेल तर बालविवाह प्रतिबंध अधिनियम कायद्यानुसार असे विवाह बालविवाह मानन्यात येतात. असे विवाह करणे कायदेशीर गुन्हा आहे.

बालविवाह निर्मूलन अभियान कम्युनिकेशन किट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण NFHS-5 नुसार परभणी जिल्हा हा महाराष्ट्र मध्ये बालविवाहाच्या बाबतीत प्रथम क्रमांकावर आहे.परभणी जिल्ह्याचे बालविवाहाचे प्रमाण ४८% एवढे आहे.

बालविवाह निर्मूलनासाठी विविध शासकीय तसेच निमशासकीय संस्था काम करत आहेत.

महिला व बालविकास विभाग, जिल्हा प्रशासन, युनिसेफ व एस. बी. सी. 3 यांच्या संयुक्त विद्यमाने सक्षम प्रकल्प अंतर्गत बालविवाह मुक्त परभणी करण्यासाठी

पंचायत विभाग, शिक्षण विभाग, एकात्मिक बालविकास विभाग, आरोग्य विभाग, जिल्हा महिला बाल विकास विभाग जिल्हा कृती आराखडा राबवून बालविवाह रोखण्यासाठी हस्तक्षेप करीत आहे.

पंचायत विभाग – ग्रामसेवक

एकात्मिक बालविकास विभाग- अंगणवाडी कार्यकर्ता

आरोग्य विभाग- आशा ताई

जिल्हा व महिला बालविकास विभाग -जिल्हा बालसंरक्षण अधिकारी, चाईल्ड हेल्प लाईन समन्वयक कार्य करत आहेत.

चला तर मग चाईल्ड हेल्पलाईन १०९८ या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून बालविवाह बदल माहिती देवूया.

बालविवाह मुक्त परभणी अभियानात सहभागी होऊन बालविवाह मुक्त परभणी करूया.

जिल्हा बालसंरक्षण कक्षाने परभणी जिल्ह्यातील मार्च २०२४ पासुन थांबवण्यात आलेल्या  बालविवाहाची संख्या खालील प्रमाणे

अनु.क्र.

महिना

थांबवलेले बालविवाह

मार्च २०२४

         ०९  

एप्रिल २०२४

         २८ 

मे २०२४

         ३५

जून २०२४

         १२ 

जुलै २०२४

         ०४  

ऑगस्ट २०२४

         ०६ 

सप्टेंबर २०२४

         १० 

ऑक्टोबर २०२४

         ०४

नोव्हेंबर २०२४

         ०५

१०

डिसेंबर २०२४

         १७

११

जानेवारी २०२५

         ०४

१२

फेब्रुवारी २०२५

         १२

१३

मार्च २०२५

         १४

 

एकूण

                     १६०