Organization of Bicycle rally on the Occasion of World AIDS Day
३ डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिनानिमित्त सायकल रॅलीचे आयोजन
जागतिक एड्स दिनानिमित्त आज दिनांक ३ डिसेंबर २०२५ रोजी जिल्हा रुग्णालय व शासकिय वैद्यकिय महाविद्यालय, परभणी यांच्या वतीने सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीचे उद्घाटन मा. जिल्हाधिकारी श्री. संजयसिंह चव्हाण यांच्या हस्ते सकाळी ८.३० वाजता हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव मा. न्यायाधिश भूषण काळे सर, मा. वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. रविंद्रनाथ चव्हाण (शासकिय वैद्यकिय महाविद्यालय), परभणी, मा. जिल्हा शल्य चिकित्सक श्री. डॉ. नागेश लखमावार, अति. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सारीका बडे मॅडम, नोडल अधिकारी डॉ. संजीवन लखमावार, जिल्हा रुग्णालयातील जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्री. देवेंद्र लोलगे, श्री. चंद्रकांत यादव, श्री संदीप घोदे, श्रीमती उषा काकडे, श्री अर्जुन राठोड, संतोष कामठे, गायकवाड, आनेराव, होले, धन्वे, तसेच ए.आर.टी सेंटरच्या वरीष्ठ वैद्यकीय अधकारी डॉ. मंजुषा कुलकर्णी व सर्व अधिकारी व कर्मचारी व सेतू सेवाभावी संस्था, सामाजिक आर्थिक विकास सेवाभावी संस्था, एन.पी.डी.पी. प्लस (विहान) यांचे प्रतिनिधी, जिल्हा परिचारीका प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थीनी, शहरातील विविध कॉलेजचे राष्ट्रीय सेवा योजनचे विद्यार्थी व नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थी/विद्यार्थीनी, जिल्हा रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते. सदरील सायकल रॅलीमध्ये सुमारे ४०० ते ५०० लोकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.
या रॅलीमध्ये एच. आय. व्ही एड्स बदद्ल कला पथकांचे सादरीकरण करण्यात आले होते. देखाव्यांचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीचा मार्ग हा जिल्हा रुग्णालय येथुन सकाळी ८.३० वाजता निघुन ती सुभाष रोड, जांब नाका, रायगड कॉर्नर, गणपती चौक ते विसावा कॉर्नर येथे विसर्जित करण्यात आली. मा. नोडल अधिकारी श्री. संजीवन लखमावार यांनी उपस्थितांना एच. आय. व्ही एड्स बाबत शपथ देण्यात आली. लसेच युवकांना एच. आय. व्ही. एड्स जनजागृतीकरिता मागदर्शन करण्यात येऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

Organization of Bicycle rally on the Occasion of World AIDS Day