Spontaneous response to the “Jai Shivaji Jai Bharat” padayatra organized on the occasion of Chhatrapati Shivaji Maharaj’s birth anniversary
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजित “जय शिवाजी जय भारत” पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजित ‘जय शिवाजी- जय भारत’ पदयात्रेस विविध मान्यवर, नागरिक, विद्यार्थी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पारंपारिक वेशभूषा व साहसी खेळांच्या सादरीकरणाने या यात्रेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून भव्य “जय शिवाजी- जय भारत पदयात्रा” आज सकाळी काढण्यात आली. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते पदयात्रेस हिरवी झेंडी दाखविण्यात आली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, महानगर पालिका आयुक्त धैर्यशील जाधव यांच्यासह विविध मान्यवर, अधिकारी, कर्मचारी, नागरिक, विद्यार्थी उपस्थित होते. यानंतर मान्यवरांच्या हस्ते श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या परिसरात शिव प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले.
ढोल पथक, लेझीमच्या तालावर यात्रेची सुरुवात झाली. यात्रेमध्ये विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने शहर दुमदुमून गेले. पदयात्रा विसावा कॉर्नर, परभणी सिटी क्लब, कन्या प्रशाला, नारायण चाळ कॉर्नर, आर.आर. टॉवर, अष्टभुजा देवी मंदिर, गांधी पार्क, शिवाजी चौक, मुनलाईट शुज शॉप कॉर्नर, गुजरी बाजार, गांधी पार्क, नारायण चाळ, महात्मा फुले पुतळा मार्गे पदयात्रेचा समारोप श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या ठिकाणी झाला.
या पदयात्रेत शाळा, महाविद्यालय, क्रीडा संघटनातील खेळाडू, विद्यार्थी सहभागी झाले होते. पदयात्रेत तलवारबाजी, लेझिम, सजीव देखावा, पारंपरिक नृत्य, जिम्नॅस्टिक खेळाचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. या पदयात्रेत सावित्रीबाई फुले कन्या प्रशाला, ज्योर्तीगमय इंग्लिश स्कुल, भारत स्काउट्स गाईड्स पथक, गांधी विद्यालय, सारंग स्वामी विद्यालय, कस्तुरबा गांधी कन्या प्रशाला, नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळा, परभणी, ज्ञानोपासक महाविद्यालय, राष्ट्रीय सेवा योजना, जिल्हा प्रशिक्षण केंद्र (खो-खो), खेलो इंडिया केंद्र, कबड्डी प्रशिक्षण केंद्र, क्रिकेट प्रशिक्षण केंद्र, बॅडमिंटन प्रशिक्षण केंद्र, स्केटिंग प्रशिक्षण केंद्र, संत तुकाराम महाविद्यालय, ज्ञानोपासक महाविद्यालय, कै. सौ. कमलताई जामकर महिला महाविद्यालय, भारतीय बाल विद्या मंदिर, शिवाजी महाविद्यालय, शारदा महाविद्यालय, शासकीय नर्सिंग कॉलेज, परभणी यांनी सहभाग नोंदवला.

padyatra 4

padyatra 5

padyatra 2