Close

Thalassemia Support Group Parbhani

  • Inauguration (7 April 2022)- MISSION 2020- VISION 2025 Thalassemia Free District Parbhani
  • dfg
  • rgt
  • fdgfdg
  • gfgf
  • rtrt

ध्येय आणि उद्दिष्ट

२०२५ नंतर परभणी जिल्ह्यात थालेसेमिया मेजर या रक्ताच्या गंभीर अनुवांशिक आजाराचा बालकाचा जन्म होऊ नये हे ध्येय आणि उधिष्ट ठेवून दिनाक ७ एप्रिल २०२२ रोजी जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून मा.जिल्हाधिकारी महोदया श्रीमती आंचल सुद गोयल मॅडम यांचे उपस्थितीत व डॉ.मनोज तोष्णीवाल रक्तविकार तज्ञ औरंगाबाद व डॉ प्रार्थना शहा (फिटल मेडीसिन तज्ञ ) यांचे मार्गदर्शनात व थालेसेमिया सपोर्ट ग्रुप व जिल्हा प्रशासनाने एकत्रितपणे “ मिशन २०२० व्हिजन२०२५ थालसेमिया मुक्त जिल्हा परभणी “ या अभियानाचा शुभारंभ बी रघुनाथ हाल येथे करण्यात आला. दिलेल्या कृती आराखड्यानुसार कामाला सुरुवात करून आपले ध्येय व उद्दिष्ट निश्चितच गाठू हा विश्वास आहे.

मिशन2020 व्हिजन2025 थालसेमिया मुक्त परभणी जिल्हा

थॅलेसेमिया हा रक्ताचा गंभीर अनुवंशिक आजार आहे. थॅलेसेमिया चे दोन प्रकार आहेत.१) थॅलेसेमिया मायनर २) थॅलेसेमिया मेजर. थॅलेसेमिया मायनर हि हिमोग्लोबिन ची एक अवस्था आहे.भारतातील १०ते१२% लोक थॅलेसेमिया मायनर आहेत.सामन्य जीवन जगत असताना ह्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास नसतो. थॅलेसेमिया मायनर हा आजार नसून रक्तातील हिमोग्लोबिनची अवस्था आहे. जर दोन थॅलेसेमिया मायनर चे लग्न झाल्यास २५% शक्यता असते की बालक नॉर्मल असेल.५०% शक्यता असते की बालक थॅलेसेमिया मायनर असेल.फक्त २५% शक्यता असते की बालक थॅलेसेमिया मेजर म्हणून जन्माला येऊ शकतो. बाळाचे जन्मानंतर साधारणतः तीन महिने किवा बालक एक वर्षाचे होईपर्यंत ह्या आजाराचे निदान होते.ह्या आजारात बालकास जिवंत राहनेकारिता दर १५ दिवसाला रक्तसंक्रमण करणे गरजेचे असते.वारवार होणाऱ्या रक्तसंक्रमणमुळे शरीरातील लोहाचे प्रमाण नियंत्रित करणेसाठी व नियमितपणे तपासणीसाठी दरमहिन्याला 8 ते १० हजार खर्च लागतो.

जर दोन थॅलेसेमिया मायनरचे लग्न झाल्यास स्त्रीरोगतज्ज्ञच्या मार्गदर्शनात गर्भधारणेच्या १०-१२ आठवड्यात CVS GENETIC ही तपासणी केल्यास बालक थॅलेसेमिया मेजर आहे का हे समजू शकते जर बालक थॅलेसेमिया मेजर असेल तर PCPNDT कायदा अंतर्गत गर्भपात करता येऊ शकतो. लग्न जर थॅलेसेमिया मायनर व नॉर्मल जोडीदारासोबत झाले असेल तर आयुष्यात थॅलेसेमिया मेजर बालकाच्या जन्माची कुठलीही शक्यता नसते. बालक थॅलेसेमिया मुक्त करण्यासाठी बोनमारो ट्रान्सप्लांट करणे गरजेचे आहे.ह्याकरिता १० ते १५ लाख रु.खर्च येतो.ह्याकरिता बालकाचे कुटुंबास वेलोर,बेंगलोर,अहमदाबाद,हैद्राबाद,पुणे,मुबई येथील बोनमारो ट्रान्सप्लांट सेंटरमध्ये तीन ते चार महिने थांबणे आवश्यक आहे. बोनमारो ट्रान्सप्लांट करण्यापूर्वी बालकाचे त्याचे सख्या बहिण/भाऊ व आई-वडिलांसोबत जुळतो का नाहो या करिता क्रॉस मचिंग (HLA TYPING) करणे गरजेचे असते.हि तपासणीसाठी एका कुटुंबास ५० ते ६० हजार रु खर्च येतो हि तपासणी अमेरिका व जर्मनीतच होते.

थॅलेसेमियाआजरा बाबत माहिती

थॅलेसेमिया हा रक्ताचा गंभीर अनुवांशिक आजार आहे. थॅलेसेमियाचे दोन प्रकार आहेत

थॅलेसेमिया मायनर– थॅलेसेमिया हा आजार नसून ती हिमिग्लोबीन मधील एक अवस्था आहे.थालासेमिया मायनर असलेली व्यक्ती सर्वसामन माणसासारखे आयुष्य जगत असतेथॅलेसेमियामायनर ची तपासणी (HPLC) जोपर्यंत करत नाहीत तोपर्यंत त्याला समजतनाही की आपण थॅलेसेमियामायनर आहोत.

थॅलेसेमिया मेजर– हा एक असा आजार आहे जो मुलामध्ये जन्मापासून पासून असतो.आई व व वडील दोघेही मायनर असल्याने त्यांच्या शरीतातील जनुकीय बदलामुळे चुकीच्या पद्धतीने हिमोग्लोबिन तयार झालेले असते.त्यामुळे त्याचा शरीरात काही महिन्यातच रक्ताची कमतरता जाणवू लागते.त्यामुळे त्यांना वारवार रक्तसंक्रमण करावे लागते.वारंवार रक्तसंक्रमणामुळे शरीरात मेदू,हृदय ,किडनी,लिवर ई अवयवावर लोहाचे प्रमाण वाढते व तो अवयव निकामी होतो व बाळ अल्पायुषी ठरते.

  • लक्षणे- * सतत आजारी असणे ,सर्दी पडस होणे ,अशक्तपणा व उदासीनता जाणवणे वयानुसार शरीराची वाढ न होणे ,अंग पिवळे पडणे,श्वास घ्यायला त्रास होणे अशी लक्षणे दिसून येतात.
  • आजार होण्याचे कारण- आई व वडील दोघेही मायनर असतील तर २५% शक्यता असतेकी बाळ नॉर्मल असेल ५०% शक्यता असेल की बाळ मायनर असेल व फक्त २५% शक्यता असते की बाळ थॅलेसेमियामेजर असते.
  • उपचार-अस्थिमज्जा प्रत्यारोपण ( Bonmarrow Transplant) हाच एकमेव उपाय ह्या आजारावर आहे.ह्या करिता सख्या बहिण /भाऊ ,आई वडील यांचे बोनमारो जुळणे गरजेचे आहे अन्यथा बाहेरील डोनर शोधावा लागतो त्यानंतर हे ऑपरेशन करण्यासाठी मुंबई,पुणे,वेल्लोर,बेंगलोर दिल्ली कलकत्ता हैद्राबाद येथे जावे लागते.

उद्देश

थॅलेसेमिया मायनर ची तपासणी विवाहपूर्व तरुणांमध्ये, गरोदर मातेच्या पहिल्या तिमाहीत आणि उच्च जोखीम असलेल्या समुदायांसाठी जागरूकता, समुपदेशन आणि थॅलेसेमियाची अनिवार्य तपासणी सुनिश्चित करणे हे या प्रकल्पाचे व्यापक उद्दिष्ट आहे. यामुळे समाजाला या आजाराची माहिती देण्यात मदत होऊ शकते, आणि भविष्यातील पिढ्यांमध्ये थॅलेसेमिया मेजर बालकाचा जन्माला येण्यापासून थांबवू शकतो व थॅलेसेमिया मुक्त परभणी जिल्हा बनवू शकतो.

परभणी थॅलेसेमिया सपोर्ट ग्रुपच्या माध्यमातून श्री लक्ष्मीकांत न. पिंपळगावकर हे 2016 पासून मिशन2020 व्हिजन2025 थालसेमिया मुक्त भारत हे अभियान महाराष्ट्रत राबवत आहेत ह्या अंतर्गत महाविद्यालयीन विध्यार्थी वधुवर सूचक मंडळे, यांच्यात या गंभीर रक्ताच्या आनुवंशिक आजाराची माहिती देऊन ह्या आजाराचा बालक जन्म घेऊ नये याकरिता प्रयत्नशील आहेत,सोबतच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना रक्तदान करिता प्रवृत्त करतात. जनसामान्यांना ह्या आजाराची समजेल अश्या सोप्या भाषेत माहिती पत्रक तयार केले असून गर्दीचे ठिकाणी व गावागावातून लावून ह्या आजाराचा बालक जन्माला येवू नये याकरिता जनजागृती करत आहेत.

आजपर्यंत थॅलेसेमिया सपोर्ट ग्रुपच्या पुढाकाराने महाराष्ट्रतील 450 थॅलेसेमियाग्रस्त बालकांचे त्यांचे सख्ये बहिण भाऊ व आई वडिलांसोबत मोफत बोनमारो क्रॉस मचिंग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते बोनमारो क्रॉस मचिंगकरिता एका कुटुंबास साधारणतः ५० ते ६० हजार खर्च लागतो. परभणी जिल्ह्यात सद्यस्थितीत १२४ थालेसेमिया मेजर बालके आहेत.यापैकी काही बालके ग्रामीण रुग्णालय सेलू ,उपजिल्हा रुग्णालय गंगाखेड,सर्वज्ञ बाल रुग्णालय परभणी व स्पर्श हॉस्पिटल येथे नियमितपणे रक्त संक्रमण करिता जात्तात.थालसेमिया सपोर्ट ग्रुपच्या समन्वयतून त्यांचे नियमितपणे रक्तविकार तज्ञांचे मार्फत तपसणी करून पुढील उपचार करण्यात येत आहेत.आजपर्यंत जिल्ह्यातील ६ बालकांची बोनमारो ट्रान्सप्लांट हि अवघड शस्त्रक्रिया वेल्लोर व पुणे येथिल दवाखान्यात यशस्वीपणे झाली आहे.शस्त्रक्रिया नंतर हि बालके थालेसेमिया मुक्त आयुष्य जगत आहेत.ह्या शस्त्रक्रियेकरिता १० लाख ते १५ लाख खर्च आला.तो विविध सेवाभावी संस्थाकडून मिळवून देण्याकरिता थॅलेसेमिया सपोर्ट ग्रुपच्या पुढाकाराने प्रयत्न केले.

सद्यस्थितीत जिल्ह्यात एकूण ३११३४ गरोदर माता असून जर त्यांची इतर आवश्यक तपासणी सोबतच जर थालेसेमिया मायनर ही तपसणी करून समुपदेशनातून थालेसेमिया मेजर बालकांचा जन्म रोखू शकू व निश्चितच २०२५ पर्यंत थालेसेमिया मुक्त परभणी करू शकू असा विश्वास आहे

शासकीय आरोग्यसेवेत गेले २४ वर्ष्यापासून काम करत सामाजिक बांधिलकी जपत उदात्त हेतू समोर ठेवून परभणी येथील श्री लक्ष्मीकांत पिंपळगावकर थॅलेसेमिया सपोर्ट ग्रुप परभणी च्या माध्यमातून महाराष्ट्रतील थॅलेसेमियाग्रस्त बालकांचे आयुष्यमान उंचवण्याकरिता गेल्या पाच वर्ष्यापासून प्रयत्नशील आहेत आजपर्यंत त्यांचे पुढाकाराने महाराष्ट्रतील १६ बालकांचे बोनमारो ट्रान्सप्लांट ऑपरेशन वेलोर,पुणे,मुबई येथे यशस्वीपणे करण्यात आले. त्यांचे ह्या अभियानाची प्रधानमंत्री कार्यालय दिल्ली व केंद्रीय आरोग्यमंत्री श्रीपदजी नाईक (आयुष मंत्रालय ) दिल्ली यांनी या कामाची दखल घेऊन कौतुक केले आहे.

थालासेमिया सपोर्ट ग्रुप

श्री लक्ष्मीकांत पिंपळगावकर, शिक्षणाने अभियंता आणि महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागात UIP टेक व्यक्ती म्हणून कार्यरत आहेत. 2016 पर्यंत त्यांना ह्या रक्ताच्या गंभीर अनुवांशिक आजाराबद्दल काहीही महिती नन्हती परंतु मरडसगाव, तालुका गंगाखेड येथील ग्रामीण मजूर श्री. कांबळे यांच्याशी त्यांची भेट झाली व संवाद साधला, जे थॅलेसेमियाग्रस्त आपल्या दोन मुलांसाठी रक्त घेण्यासाठी आले होते. यामुळे त्यांच्या मनात विचारांची साखळी निर्माण झाली आणि म्हणून त्यांनी ‘थॅलेसेमिया मुक्त भारत ‘ हे ध्येय हाती घेण्याचे ठरवले.

थॅलेसेमिया सपोर्ट ग्रुप सदस्यांच्या सहकार्याने थॅलेसेमिक रूग्णांना आवश्यक गटांच्या रक्ताची व्यवस्था करून त्यांना मदत करण्यास सुरुवात केली. सपोर्ट ग्रुप सुरू करण्यासाठी डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते आणि संबंधितांशी संपर्क हाच अंतिम पर्याय होता. सुदैवाने त्याला समाजाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, ज्यामुळे एक मजबूत ‘परभणी थॅलेसेमिया सपोर्ट ग्रुप (PTSG)’ ची स्थापना झाली.

8 मे 2016 रोजी परभणी येथे जागतिक थॅलेसेमिया दिन साजरा करण्याच्या संस्थेच्या पहिल्या मोठ्या कार्यक्रमाने विस्तार कार्याला सुरुवात झाली. जिल्हा दंडाधिकारी, सिव्हिल सर्जन आणि सामाजिक कार्यकर्ते आणि इतर अनेकांसह समाजाच्या सर्व स्तरातील दिग्गजांनी उद्घाटनाला आशीर्वाद दिले.

2019 या वर्षात थॅलेसेमिया सपोर्ट ग्रुपच्या क्रियाकलापांमध्ये बरीच प्रगती झाली. एचएलए टायपिंग, भावंडांमधील रक्तसंक्रमणासाठी योग्य जुळणी ओळखणारी चाचणी, मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात आली. चाचणीसाठी अनेकांनी नोंदणी केली. जे आले त्यांच्यापैकी, 200 पेक्षा जास्त टाइप केले गेले, ज्यांचे परिणाम खराब ते अतिशय मजबूत दरम्यान भिन्न होते. सर्व भावंडांपैकी सुमारे 33% 10×10 जुळणी प्रदर्शित करताना आढळले. हा केवळ या जिल्ह्यातच नव्हे, तर राज्यातही एक अग्रगण्य प्रयत्न आहे. सहभागी चार वेगवेगळ्या भारतीय राज्यांमधून आले होते, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्र, अशा प्रकारे थॅलेसेमिया सपोर्ट ग्रुपला प्रथमच इतर राज्यातील संपर्क मिळाला.

पुढील महत्त्वाकांक्षी पाऊल म्हणजे समाजातील प्रत्येक क्षेत्रात सर्वांगीण जागरूकता वाढवणे. हे जोरदार क्रियाकलापांद्वारे केले गेले जसे की:

  • भारतातील ग्रामीण भागात आरोग्याशी संबंधित उपक्रमांचा कणा असलेल्या आशा कार्यकर्त्यांमध्ये जागरूकता.
  • महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये विस्तार क्रियाकलाप
  • येत्या काही महिन्यांत लग्न करणार असलेल्या अपेक्षित जोडप्यांना जाणीव करून देणे.
  • ज्यांचे अगोदरचे मूल थॅलेसेमियाने ग्रस्त आहे, त्यांना पुढील गर्भधारणेच्या भविष्यातील परिणामांबाबत चेतावणी देण्यात आली.
  • संपूर्ण देशभरात नोंदणीसाठी वेबसाइट तयार केलेली आहे, जेणेकरून ठोस डेटा मिळू शकेल जेणेकरून भविष्यात भातातील थॅलेसेमिया मेजर बालकांचे आयुष्यमान उंचवण्यासाठी मदत होईल.
  • अनेक स्वयंसेवकांनी या समस्येशी संबंधित डेटा गोळा करण्यासाठी जिल्हा समन्वयक म्हणून सहभागी होण्याचे मान्य केले आहे.

थॅलेसेमियासपोर्ट ग्रुप व दात्री इंटरनॅशनल फाउंडेशन, चेन्नई, हिस्टोजेनेटिक्स लॅब, न्यू यॉर्क, यूएसए व संकल्प इंडिया फोंडशन बेंगलोर यांचे सोबत सामंजस्य करार(MOU) झालेला आह्या माध्यमातून आजपर्यंत महाराष्ट्र व इतर राज्यातील एकूण कुटुंबातील २००० पेक्षा जास्त व्यक्तीचे बोनमारो क्रोस मचिंग मोफत करून देण्यात आले.हि तपासणी भारतात होत नाही जगात फक्त अमेरिका व जर्मनी येथे हि तपासणी होते ह्या करिता एका कुटुंबास ७०ते ८० हजार रु लागत्तात.

थॅलेसेमियासपोर्ट ग्रुपला मार्गदर्शन व सहकार्य करणारे तज्ञ मार्गदर्शक

    • डॉ मनोज तोष्णीवाल,रक्तविकारतज्ञ जीवनामृत हॉस्पिटल औरंगाबाद,
    • डॉ समीर मिलिंकेरी,रक्तविकारतज्ञ दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल पुणे
    • डॉ प्रार्थना शहा फिटलं मेडेसीन के पौंड हॉस्पिटल औरंगाबाद
    • डॉ मोहन रेड्डी संकल्प इंडिया फोंडेशन बेंगलोर

यांच्या जवळच्या सहकार्याने काम करत आहोत. विशेषत: पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमधील डॉ समीर मिलिंकेरी पुणे भगवान महाविरदास जैन हॉस्पिटल बेंगलोर यांनी आम्हाला कमी खर्चात रुग्णाची बीएमटी यशस्वीरित्या पूर्ण करण्यात मदत केली.

प्रशंसा

या छोट्या प्रवासात थॅलेसेमियासपोर्ट ग्रुपला सरकारी आणि अशासकीय अशा दोन्ही संस्थांकडून कौतुकाची अनेक चिन्हे मिळाली आहेत.

  • २०१७ साली महाराष्ट्रातील थॅलेसेमिया जनजागृतीसाठी थॅलेसेमियासपोर्ट ग्रुप करत असलेल्या कामाची दखल घेवून 2017 मध्ये बडोदा गुजरात येथे राज्याच्या आरोग्य मंत्री श्रीमती निर्मलाबेन मेहता व थॅलेसेमिक इंडियाच्या सचिव श्रीमती शोभा तुली यांनी 2017ला National Thalassemia Meet 2017 मध्ये दिलेला प्रशंसा पुरस्कार.
  • २०१८ साली माहिती व जनसंपर्क महासंचनालय महाराष्ट्र राज्य यांचे तर्फे सोशल मिडीयावरील थॅलेसेमियाजनजागृतीसाठी “सोशल मिडिया –महामित्र पुरस्काराने सन्मानित केले.
  • २०१९ साली भारताच्या माननीय पंतप्रधानांच्या कार्यालयाकडून थॅलेसेमियासपोर्ट ग्रुप परभणी तर्फे राबवत असलेल्या MISSION2020 THALASSEMIA FREE INDIA या नाविन्पूर्ण अभियानाची दखल घेत खास पत्र पाठवून प्रशंसा केली.
  • २०२० व २०२१ कोविड१९ कालावधीत राज्यातील सर्व जिल्ह्यातील “समावेशित शिक्षण,समग्र शिक्षण जिल्हा शेक्षणिक व प्रशिक्षण संस्थाच्या माध्यमातून ‘थॅलेसेमियाआजार,उपचार व प्रतिबंध ‘ या विषयावर कार्यशाळा घेवून विध्यार्थी शाळाबाह्य राहू नये व त्यांना अपंग प्रमाणपत्र कसे काढण्यासाठी मदत करता येईल याबाबतीत जागृतीसाठी ONLINE कार्यशाळा घेतल्या.
  • २०२२ साली मा.आंचलजी गोयल (I.A.S.) जिल्हाधिकारी परभणी यांनी थॅलेसेमियासपोर्ट ग्रुपने कोविड १९ च्या अत्यंत आणीबाणीच्या काळात मराठवाडयातील थॅलेसेमियाव हिमोफिलिया रुग्णांकरिता केलेल्या कामाचे प्रशस्तीपत्रती देवून गौरव केला.
  • ७ एप्रिल २०२२ रोजी २०२५ नंतर परभणी जिल्ह्यात एकही थॅलेसेमियामेजर बाळ जन्माला येवू नये हे ध्येय आणि उधीष्टय ठेवून मा.जिल्हाधिकारी महोदया श्रीमती आंचलजी गोयल यांचे अध्यक्षतेखाली “व्हिजन२०२५ थॅलेसेमिया मुक्त जिल्हा परभणी” ह्या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.
  • आज पर्यंत परभणी जिल्ह्यातील १० बालकांचे व राज्यातील ३२ बालकांचे बोनमारो ट्रान्सप्लांट ही अवघड व महागडी शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण करण्यात आल्या.
  • मा.प्रधानमंत्री ,भारत सरकार व मा.डॉ मनसुख मांडवीय आरोग्य मंत्री भारत सरकार यांना मा.खासदार डॉ फौझिया खान (राज्यसभा सदस्य) यांनी थॅलेसेमियासपोर्ट ग्रुप परभणी राबवत असलेले अभियान बाबतीत दखल घेवून देशपातळीवर हे अभियानाची अंमलबजवणी बाबत पत्र पाठवले आहे. (२१/१०/२०२३)

राबवीत असलेले नाविन्यपूर्ण उपक्रम

* नियमितपणे जिल्ह्यातील व राज्यातील थॅलेसेमियामेजर बालकांकरीता मोफत HLA TYPING शिबिराचे आयोजन करणे.

*२०२५ नंतर परभणी जिल्ह्यात एकही थॅलेसेमियामेजर बालक जन्माला येवू नये या करिता ‘व्हिजन२०२५ थॅलेसेमियामुक्त जिल्हा परभणी “ अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.यात जिल्ह्यातील सर्व गरोदर मातांची पहिल्या तिमाहीत थॅलेसेमियामायनर ची तपासणी करून संमोपदेशन करण्यात येत आहे.

*२९ जानेवारी २०२४ रोजी “परभणी मेडिकल कॉलेज संकल्प इंडिया फोन्देशन बेंगलोर व थॅलेसेमियासपोर्ट ग्रुप परभणी यांचे समन्वयातून अद्यवत १० बेड च्या थालसेमिया/हीमोफिलाया/सिकलसेल डे केयर सेंटर “ चालू करण्यात आले.

*२०१६ पासून जनसामन्या पर्यंत या आजाराची माहिती पोहचावी व जनजागृतीसाठी थॅलेसेमियासपोर्ट ग्रुप ने मराठीत तयार केलेले भित्तीपत्रके व माहितीपत्रके चे वाटप करणे व गर्दीचे ठिकाणी लावणे .

वचनबद्धता

  1. 2025 च्या अखेरीस प्रथमतः परभणी जिल्ह्यातून थॅलेसेमिया महामारीचे संपूर्ण निर्मूलन करण्याचे उद्दिष्ट. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नजरेखाली आशा कार्यकर्त्यांच्या मदतीने गर्भवती महिलांची तपासणी करण्याचा तिप्पट दृष्टीकोन, नियतकालिक तपासणीद्वारे आयुर्मान वाढवण्यासाठी रुग्णाचे व्यवस्थापन- वर, बीएमटी सारख्या उपचारात्मक उपचारांची व्यवस्था.
  2. 2025 च्या अखेरीस सर्व रुग्णांसाठी अपंग प्रमाणपत्रांची खरेदी, उच्च केंद्रांवर त्यांचे व्यवस्थापन सुलभ करण्यासाठी,
  3. 2025 च्या अखेरीस प्रत्येक जिल्हा मुख्यालयात थॅलेसेमिया औषधांचा पुरेसा पुरवठा
  4. डे केअर सेंटर्स, रक्तपेढ्या, जिल्हा रुग्णालयांमध्ये २०२५ पर्यंत सर्व रुग्णांची माहिती गोळा करणे.एचएलए टायपिंग झाले की नाही, औषधांची उपलब्धता, प्रमाणित हिमॅटोलॉजिस्टच्या नियमित भेटी, अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळाले की नाही, इत्यादी मुद्द्यांवर माहिती मिळवण्यासाठी विस्तृत प्रश्नावलीचे वारंवार अद्ययावत करणे. या डेटाच्या आधारे, एक व्यापक अहवाल सादर केला जाईल 2025 च्या शेवटी सरकार, एक बुद्धिमान धोरण तयार करण्यात मदत करण्यासाठी.
  5. दात्री आणि एचजीआय लि.च्या मदतीने सर्व जिल्हा मुख्यालयात एचएलए शिबिरांचे आयोजन. बीएमटीसाठी योग्य प्रकरणे ओळखणे, त्यानंतर प्रगत वैद्यकीय सुविधा आणि रुग्ण यांच्यात संबंध जोडणे आणि प्रक्रियेसाठी आर्थिक मदत घेणे.
  6. थॅलेसेमियाच्या जनजागृतीची राज्यव्यापी मोहीम, लघुपट तयार करून प्रत्येक शिबिरात आणि सार्वजनिक प्रसंगी त्याचे प्रदर्शन, नियतकालिक पत्रिका छापणे आणि वितरण, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडियाचा वापर, जनजागृतीसाठी सर्व वैवाहिक वेबसाइटचा सहभाग आवश्यक आहे. लग्नाआधीच्या स्क्रीनिंगचा भाग.
  7. कुशल आणि अर्ध-कुशल लोकांना तयार करणे, त्यांना सॉफ्ट स्किल्सचे प्रशिक्षण देऊन प्रभावित कुटुंबांचे समुपदेशन करणे.

                              आम्ही भारतातील प्रत्येक नागरिकाला आवाहन करतो की, देशाला थॅलेसेमियामुक्त करण्याच्या या उदात्त कार्यासाठी समर्पित व्हावे. थॅलेसेमियाशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी, अगदी जागृती शिबिरांचे आयोजन करण्यासाठी केलेल्या प्रत्येक आवाहनाचे येथे स्वागत आहे. चला, सुरुवात करू या, चला आणि निरोगी भारतासाठी समर्पित करूया.

        **********vision2025 thalassemia Free Bharat*********