Close

Thalassemia Support Group Parbhani

  • Inauguration (7 April 2022)- MISSION 2020- VISION 2025 Thalassemia Free District Parbhani

    Inauguration (7 April 2022)- MISSION 2020- VISION 2025 Thalassemia Free District Parbhani.

    Inauguration (7 April 2022)- MISSION 2020- VISION 2025 Thalassemia Free District Parbhani.

  • dfg

    WhatsApp Image 2022-10-12 at 11.57.51 AM

    WhatsApp Image 2022-10-12 at 11.57.51 AM

ध्येय आणि उद्दिष्ट

          २०२५ नंतर परभणी जिल्ह्यात थालेसेमिया मेजर या रक्ताच्या गंभीर अनुवांशिक आजाराचा बालकाचा जन्म होऊ नये हे ध्येय आणि उधिष्ट  ठेवून दिनाक  ७ एप्रिल २०२२ रोजी जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून मा.जिल्हाधिकारी महोदया श्रीमती आंचल सुद गोयल मॅडम यांचे उपस्थितीत व डॉ.मनोज तोष्णीवाल रक्तविकार तज्ञ औरंगाबाद व डॉ प्रार्थना शहा (फिटल मेडीसिन तज्ञ ) यांचे मार्गदर्शनात व थालेसेमिया सपोर्ट ग्रुप व जिल्हा प्रशासनाने एकत्रितपणे “ मिशन २०२० व्हिजन२०२५ थालसेमिया मुक्त जिल्हा परभणी “  या अभियानाचा शुभारंभ बी रघुनाथ हाल येथे करण्यात आला. दिलेल्या कृती आराखड्यानुसार कामाला सुरुवात करून आपले ध्येय व उद्दिष्ट निश्चितच गाठू हा विश्वास आहे. 

                मिशन2020 व्हिजन2025 थालसेमिया मुक्त परभणी जिल्हा

 

        थॅलेसेमिया हा रक्ताचा गंभीर अनुवंशिक आजार आहे. थॅलेसेमिया चे दोन प्रकार आहेत.१) थॅलेसेमिया मायनर २) थॅलेसेमिया मेजर. थॅलेसेमिया मायनर हि हिमोग्लोबिन ची एक अवस्था आहे.भारतातील १०ते१२% लोक थॅलेसेमिया मायनर आहेत.सामन्य जीवन जगत असताना ह्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास नसतो. थॅलेसेमिया मायनर हा आजार नसून रक्तातील हिमोग्लोबिनची अवस्था आहे. जर दोन थॅलेसेमिया मायनर चे लग्न झाल्यास २५% शक्यता असते की बालक नॉर्मल असेल.५०% शक्यता असते की बालक थॅलेसेमिया मायनर असेल.फक्त २५% शक्यता असते की बालक थॅलेसेमिया मेजर म्हणून जन्माला येऊ शकतो. बाळाचे जन्मानंतर साधारणतः  तीन महिने किवा बालक एक वर्षाचे होईपर्यंत ह्या आजाराचे निदान होते.ह्या आजारात बालकास जिवंत राहनेकारिता दर १५ दिवसाला रक्तसंक्रमण करणे गरजेचे असते.वारवार होणाऱ्या रक्तसंक्रमणमुळे शरीरातील लोहाचे प्रमाण नियंत्रित करणेसाठी व नियमितपणे तपासणीसाठी दरमहिन्याला 8 ते १० हजार खर्च लागतो.       

          जर दोन थॅलेसेमिया मायनरचे लग्न झाल्यास स्त्रीरोगतज्ज्ञच्या मार्गदर्शनात गर्भधारणेच्या १०-१२ आठवड्यात CVS GENETIC ही तपासणी केल्यास बालक थॅलेसेमिया मेजर आहे का हे समजू शकते जर बालक थॅलेसेमिया मेजर असेल तर PCPNDT  कायदा अंतर्गत गर्भपात करता येऊ शकतो. लग्न जर  थॅलेसेमिया मायनर व नॉर्मल जोडीदारासोबत झाले असेल तर आयुष्यात थॅलेसेमिया मेजर बालकाच्या जन्माची कुठलीही शक्यता नसते. बालक थॅलेसेमिया मुक्त करण्यासाठी बोनमारो ट्रान्सप्लांट करणे गरजेचे आहे.ह्याकरिता १० ते १५ लाख रु.खर्च येतो.ह्याकरिता बालकाचे कुटुंबास  वेलोर,बेंगलोर,अहमदाबाद,हैद्राबाद,पुणे,मुबई येथील बोनमारो ट्रान्सप्लांट सेंटरमध्ये तीन ते चार महिने थांबणे आवश्यक आहे. बोनमारो ट्रान्सप्लांट करण्यापूर्वी बालकाचे त्याचे सख्या बहिण/भाऊ व आई-वडिलांसोबत जुळतो का नाहो या करिता क्रॉस मचिंग (HLA TYPING) करणे गरजेचे असते.हि तपासणीसाठी एका कुटुंबास ५० ते ६० हजार रु खर्च येतो हि तपासणी अमेरिका व जर्मनीतच होते.

                         उद्देश    

           थॅलेसेमिया मायनर ची तपासणी विवाहपूर्व तरुणांमध्ये, गरोदर मातेच्या पहिल्या तिमाहीत आणि उच्च जोखीम असलेल्या समुदायांसाठी जागरूकता, समुपदेशन आणि थॅलेसेमियाची अनिवार्य तपासणी सुनिश्चित करणे हे या प्रकल्पाचे व्यापक उद्दिष्ट आहे. यामुळे समाजाला या आजाराची माहिती देण्यात मदत होऊ शकते, आणि भविष्यातील पिढ्यांमध्ये थॅलेसेमिया मेजर बालकाचा जन्माला येण्यापासून थांबवू शकतो व थॅलेसेमिया मुक्त परभणी जिल्हा  बनवू शकतो.

       परभणी थॅलेसेमिया सपोर्ट ग्रुपच्या माध्यमातून श्री लक्ष्मीकांत न. पिंपळगावकर हे 2016 पासून मिशन2020 व्हिजन2025 थालसेमिया मुक्त भारत हे अभियान  महाराष्ट्रत राबवत आहेत ह्या अंतर्गत महाविद्यालयीन विध्यार्थी वधुवर सूचक मंडळे, यांच्यात या गंभीर रक्ताच्या आनुवंशिक आजाराची माहिती देऊन ह्या आजाराचा बालक जन्म घेऊ नये याकरिता प्रयत्नशील आहेत,सोबतच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना रक्तदान करिता प्रवृत्त करतात.             जनसामान्यांना ह्या आजाराची समजेल अश्या सोप्या भाषेत माहिती पत्रक तयार केले असून गर्दीचे ठिकाणी व गावागावातून लावून ह्या आजाराचा बालक जन्माला येवू नये याकरिता जनजागृती करत आहेत.         

             आजपर्यंत थॅलेसेमिया सपोर्ट ग्रुपच्या  पुढाकाराने महाराष्ट्रतील 450 थॅलेसेमियाग्रस्त बालकांचे त्यांचे सख्ये बहिण भाऊ व आई वडिलांसोबत मोफत बोनमारो क्रॉस मचिंग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते बोनमारो क्रॉस मचिंगकरिता एका कुटुंबास साधारणतः ५० ते ६० हजार खर्च लागतो.                              परभणी जिल्ह्यात सद्यस्थितीत १२४ थालेसेमिया मेजर बालके आहेत.यापैकी काही बालके ग्रामीण रुग्णालय सेलू ,उपजिल्हा रुग्णालय गंगाखेड,सर्वज्ञ बाल रुग्णालय परभणी व स्पर्श हॉस्पिटल येथे नियमितपणे रक्त संक्रमण करिता जात्तात.थालसेमिया सपोर्ट ग्रुपच्या समन्वयतून त्यांचे नियमितपणे रक्तविकार तज्ञांचे मार्फत तपसणी करून पुढील उपचार करण्यात येत आहेत.आजपर्यंत जिल्ह्यातील ६ बालकांची बोनमारो ट्रान्सप्लांट हि अवघड शस्त्रक्रिया वेल्लोर व पुणे येथिल दवाखान्यात यशस्वीपणे झाली आहे.शस्त्रक्रिया नंतर हि बालके थालेसेमिया मुक्त आयुष्य जगत आहेत.ह्या शस्त्रक्रियेकरिता १० लाख ते १५ लाख खर्च आला.तो विविध सेवाभावी संस्थाकडून मिळवून देण्याकरिता थॅलेसेमिया सपोर्ट ग्रुपच्या  पुढाकाराने प्रयत्न केले.                     

            सद्यस्थितीत   जिल्ह्यात एकूण ३११३४  गरोदर माता असून जर त्यांची इतर आवश्यक तपासणी सोबतच जर थालेसेमिया मायनर ही तपसणी करून समुपदेशनातून थालेसेमिया मेजर बालकांचा जन्म रोखू शकू व निश्चितच २०२५ पर्यंत थालेसेमिया मुक्त परभणी करू शकू असा विश्वास आहे      

          शासकीय आरोग्यसेवेत गेले २४ वर्ष्यापासून काम करत सामाजिक बांधिलकी जपत उदात्त हेतू समोर ठेवून परभणी येथील श्री लक्ष्मीकांत पिंपळगावकर थॅलेसेमिया सपोर्ट ग्रुप परभणी च्या माध्यमातून महाराष्ट्रतील थॅलेसेमियाग्रस्त बालकांचे आयुष्यमान उंचवण्याकरिता गेल्या पाच वर्ष्यापासून प्रयत्नशील आहेत आजपर्यंत त्यांचे पुढाकाराने महाराष्ट्रतील १६ बालकांचे बोनमारो ट्रान्सप्लांट ऑपरेशन वेलोर,पुणे,मुबई येथे यशस्वीपणे करण्यात आले. त्यांचे ह्या अभियानाची प्रधानमंत्री कार्यालय दिल्ली व केंद्रीय आरोग्यमंत्री श्रीपदजी नाईक (आयुष मंत्रालय ) दिल्ली यांनी या कामाची दखल घेऊन कौतुक केले आहे.